Posts

मी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय!

Image
महाराष्ट्रभरातल्या, देशातल्या आणि विदेशातीलही माझ्या तथाकथित भीमसैनिकांनो! माझ्याच नावाने मिरवणाऱ्या तुम्हा सैनिकांना ‘तथाकथित’ म्हणताना मला काय वेदना होत असतील, याची पुसटशी जाणीव जरी तुम्हाला झाली तरी माझ्या या संवादाचे प्रयोजन साध्य झाले असे मी समजेन. तथाकथित म्हणालो कारण आज देशभरात खंडीभर सेना आणि त्यांचे तेवढेच सैनिक सापडतील. माझे वडील सुभेदार होते आणि माझं बालपण कॅन्टोटमेंट परिसरात गेलं. ‘सैन्य, सेना आणि सैनिक’ याचं त्या काळातलं चित्रं व आजचं चित्र यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. पुढे माझी ओळख भीमा कोरेगावच्या महार पलटणीतील योद्ध्यांशी झाली. तो अभिमानास्पद इतिहास रक्तात घोळवून महाडचे चवदार तळे आणि काळाराम मंदिराच्या लढाईत मी आणि माझे सहकारी उतरलो, लढलो आणि जिंकलोही! एका बाजूला गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याची लढाई आणि दुसऱ्या बाजूला देशांतर्गतच फुले-शाहूंच्या वारसा आशीर्वादाने लढत असलेली जातीअंताची लढाई हा संघर्ष मोठा होता. पुढे पुणे करार, घटना समितीचा अध्यक्ष, संविधानाची निर्मिती, कायदा मंत्री, हिंदू कोड बिल, ते अर्धवट स्वीकारले म्हणून दिलेला राजीनामा आणि नंतरचे...

असामान्य व्यक्तीमत्व

Image
असामान्य व्यक्तीमत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! भेंडाळा गावाचे भाग्य विधाते व आम्हा तरुणांचे प्रेरणास्थान व निर्लोभ समाजकारणी व भेंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री. रामेश्वर परभणे पाटील यांचा आजचा वाढदिवस हा आमच्यासाठी आनंदोत्सवच. रामेश्वर परभणे पाटील यांची भेंडाळा ग्रामपंचायत व पंचक्रोशीत सरपंच म्हणून ओळख जरी असली तरी मात्र मी भाऊ याच नावाने त्यांना संबोधतो. आणि तेसुद्धा जेव्हा मी गावाकडे आलो की माझी नेहमीच आत्मियतेने विचारपूस करत त्यामुळे त्यांच्यातील आपुलकी व आपलेपण असं बहुआयामी व्यक्तीमत्व त्यांच्या स्वभावातून प्रकर्षांने जाणवते. भाऊ विषयी लिहिण्या इतका मी मोठा नाही तरीदेखील त्यांच्या विषयी दोन शब्द लिहिण्याचे धाडस मी करत आहे. उजळ माथ्याची आणि स्वच्छ हाताची माणसे आज अत्यंत दुर्मिळ होऊन बसली आहेत. परंतू भाऊंच्या रूपाने गावाला मिळालेले सर्वोत्तम बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले आहे. जिकडे पाहवे तिकडे अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, घोटाळे, व गैरव्यवहार दिसून येतात. प्रामाणिकपणा, सचोटी, परिश्रम, सौजन्य, सात्विकता, सरळपणा, सत्य, सहानुभूति, संवेदनशीलता, नि:स्वार्थीपणा, निर...
Image
गंगापूर तालुक्यातील शेती प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे, प्रगतशील शेतकरी तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे झुंजार, परखड नेतृत्व व तालुकाध्यक्ष श्री. भाऊसाहेब शेळके पाटील यांना मानाचा "मराठवाडा भूमिपुत्र पुरस्कार-२०१८" हा दैनिक लोकपत्रच्या वतीने जाहीर करण्यात आल्या बद्दल भाऊसाहेब शेळके पाटील यांचे मनःपुर्वक अभिनंदन .        दैनिक लोकपत्र यावर्षीपासून समाजाच्या विविध क्षेत्रात विशिष्ट उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना "मराठवाडा भूमिपुत्र" व "मराठवाडा भुमिकन्या" हा पुरस्कार देऊन सन्मानित करत असून दैनिक लोकपत्र औरंगाबाद आवृत्तीच्या २३ व्या वर्धापनदिना निमित्त २३ व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात  ११ भूमिपुत्र व १२ भुमिकन्यांचा समावेश आहे.       गंगापूर तालुका हा विचारांचा व चळवळींचा तालुका आहे. हा तालुका आवर्षणप्रवण असून येथे सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. भाऊसाहेब शेळके पाटील गंगापूर येथील भिवधानोरा या छोट्याशा गावातून मराठवाडा व औरंगाबाद मधील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पुरस्कार यादीत सामील झाले आहेत. क...

वाघाला मांजरांची धमकी! !

Image
कितीही आले सरकारचे भाडखाऊ तरी डगमगणार नाही हा बच्चु भाऊ!       या महाराष्ट्रात खऱ्या देशभक्तांची आणि देशभक्तीची किंमत कमी जाणवायला लागलीय. खरेचं या विधानाची तीव्रता खूप जाणवू लागलीय.      शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अपंग  व रूग्ण यांच्यासाठी अहोरात्र धावून स्वतः निवेदने व वेळप्रसंगी आंदोलन करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून सरकारची तिजोरी गरिबांच्या झोपडीत रिकामी करण्यासाठी सरकारला भाग पाडून खऱ्या अर्थाने नायक ठरलेल्या बच्चु भाऊंची सबंध महाराष्ट्रात प्रसिद्धी होत असल्याने  त्याचा राग ह्या भ्रष्ट सरकारला येऊ नये यात काय ते नवल.      माझ्या मते प्रथमदर्शनी खरा मुद्दा आत्ताचाच दिसतोय तो म्हणजे "मी लाभार्थी " या विषयावरील तद्दन फालतू व खोटी जाहिरातबाजी करून जी जनतेची दिशाभूल करून सरकार जनतेला गंडवत होते त्यांना त्यांच्याच भाषेत बच्चु भाऊंनी "मी लाभार्थी " याची खरी पोस्टर जनतेसमोर आणली आणि असून नसलेल्या या ऐतखाऊ सरकार विरोधात एक आंदोलन क्रांतीची मशाल पेटवली.  त्यामुळे खालुन वरपर्यंत आग व जळफळाट ...

शिवाजी भाऊ गाडे

Image
जय प्रहार मित्रांनो , बरेच दिवस झाले मी सोशल नेटवर्किंग या माध्यमाचा कमी प्रमाणात वापर करतोय आणि आता तर पुर्वी पेक्षा अधिक म्हणजे आणखी काही काळासाठी अलिप्त राहावे असे वाटत आहे. त्याचे कारण जरा व्यक्तिगत पातळीवर असल्याने मी ते खाजगीतच ठेवू इच्छित आहे. आज सकाळपासून कामात व्यस्त असल्याने कुणाला बोलण्याच्याही स्थितीत नव्हतो. त्यात व्हाट्सअॅप आणि फेसबुकवर अक्षरशः मॅसेजेसचा पाऊस पडला असल्याने मेमरी पुर्ण भरल्याचा संदेश वारंवार येत होता. तेव्हा बाहेर पाऊस आणि मोबाईलमध्ये सुद्धा पाऊस पाहुन आता तर कंटाळा आला होता. म्हणून मी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि ब्लॉग हे डिलीट करण्या आगोदर त्यातील नोटीफिकेशन चाळत असताना फेसबुकवर तेवढ्यात नोटीफिकेशन बेलवर एक मेसेज आला. बघतो तर त्यात एक आनंदाची बातमी. खरंतर ती मी विसरायला नव्हती पाहिजे ती म्हणजे माझ्या ह्रदयस्थानी आणि प्रेरणास्थानी असणारे व्यक्तीमत्व म्हणजे श्री. शिवाजी भाऊ गाडे यांचा आज वाढदिवस... ज्यांच्यामुळे मला प्रहार संघटना आणि त्यांच्या संबंधीत असलेले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे भरभरून मिळालेले प्रेम विसरता येणार नाही. कामा...

बच्चु भाऊ आणि सरकारी अधिकारी

‘मनगटशाही म्हणजेच पुरुषार्थ’ असे वाटण्यास खतपाणी घालणारे राजकारणीही आसपास असतील तर अशा समाजात सभ्य असणे हे मागासलेपणाचेच समजले जाणार.. छोटा-मोठा का असेना कायदा मोडणा...

दिनदुबळ्यांचा मसिहा…..!

Image
दिनदुबळ्यांचा मसिहा…..! आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त लिहलेला अप्रतिम लेख माझ्या आयुष्यावर परिणाम करून गेलेला बच्चु कडु हा एक जबरदस्त माणूस. तुम्ही लोक कसे ...