_छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या सहवासात रमणारे... किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणारे... प्रत्येक गड किल्ल्यांवर वृक्षारोपण असो वा एखाद्या रक्तदान शिबिरात स्वतः जातीने हजर राहणारे...स्वतःच्या अल्पशा पगारातही दरवर्षी अपंगांसाठी स्वखर्चाने शिवदुर्ग गडाच्या सहली आयोजित करणारे... प्रहार जनशक्ती पक्षाचे महत्त्वपूर्ण संघटक व प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबादचे प्रमुख जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भाऊ गाडे औरंगाबादकरांना मिळालेले एक निडर, परखड, ध्येयवादी व्यक्तीमत्व. शारिरीक अपंगत्व असतानाही कळसुबाई शिखर सलग पाच वेळा सर करून आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवदुर्ग गड किल्ले शंभर पेक्षाही अधिक वेळा चढाई करणारे असे ध्येयवादी रत्न औरंगाबादकरांना मिळणे ही बाब आपल्या साठी निश्चितच अभिमानास्पद आहे._ _महाराष्ट्राची बुलंद तोफ..._ _आपल्या सर्वांचे आदरणीय, वंदनीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक यांनी त्यांच्यातील चांगले गुण ओळखत औरंगाबाद मधील अपंग बांधवांच्या मदतीसाठी त्यांना पक्षाचे महत्त्वपूर्ण स्थान देऊन समस्त औरंगाबाद मधील अपंगांसाठी एक नवी उमेद उभी केली. तेव्हापासून आजतागायत जिल्हाभरातील कोण...