दिनदुबळ्यांचा मसिहा…..!

दिनदुबळ्यांचा मसिहा…..! आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त लिहलेला अप्रतिम लेख

माझ्या आयुष्यावर परिणाम करून गेलेला बच्चु कडु हा एक जबरदस्त माणूस. तुम्ही लोक कसे आहेत हे हजार सांगू शकाल हो, पण तुम्ही स्वत: कसे आहात हे सांगायला संत तुकारामाचीच छाती लागते; आणि ती तिन्ही त्रिकाळ उघडी असावी लागते, तिच्यात येत असलेले उमाळे भडाभडा बाहेर पडू दिले नाहीत तर ते तसेच साठतात आणि दुर्गंध येऊ लागतो, सेप्टीकही होण्याची शक्यता असते. आता संत तुकाराम एका अभंगात स्वत:लाच सांडा म्हणून घेतायत. सांड पाहिलाय का कधी? अगदी माझ्यासारखाच असतो! लोक जवळ जायला घाबरतात त्याच्या. कारण त्याचं काही सांगता येत नाही – कधी शिंगावरही घेईल, कधी धडकही देईल, तर कधी शांतपणे उभा राहील, चोंबाळू (आता हा शब्द कळायला खेड्यात जन्म घ्यावा लागतो) देईल. त्याच्याबद्दल तुम्ही काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही.

सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती असं तुकाराम म्हणालेत. दोन विरूध्द दिसणार्‍या गोष्टी जेव्हा चित्तात एकत्र येतात ना, तेव्हा तिथे एक रासायनिक प्रक्रिया घडते. जसं ३ + २ एकत्र केलात तर ५ होतात. आता या ५ मध्ये ३ नाहीत का? २ नाहीत का? आहेत ना. दोन्हीही आहे तिथं. पण हे दोन्ही असूनही ५ चं एक वेगळं अस्तित्व आहे. याच चालीवर विटंबना आणि सन्मानसुध्दा चित्तात एकत्र होतात, तेव्हा विटंबनाही तिचा गुण हरवून बसते आणि सन्मानही त्याचा गुण हरवून बसतो. या दोन्हीतुन एक वेगळंच रसायन तयार होतं – त्याचं नाव “बच्चु कडु”

असंख्य जनतेचा कैवारि ” बच्चु कडू” आज ४७ वर्षांचे झाले! राजकारणातला असो नसो, प्रहार चि भूमिका मानणारा असो नसो महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकानं क्षणभर थांबून या सम्राटाचं अभिष्टचिंतन करण्याचा हा दिवस आहे. कारणे स्पष्ट आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या महाराष्ट्रीय अस्मितेमधील बच्चु भाऊ हे मुकूटणी आहेत; बच्चु भाऊ हा एक संस्कार आहे! हे व्यक्तीमत्वच करिष्माई आहे. प्रहार प्रमुख म्हणून त्यांनी निभावलेल्या भूमिकांबद्दल वाद असतील, पण तो बच्चु भाऊंचा फक्त एक पैलू आहे; आणि त्यातूनही कुणाच्याही मनावर आक्रामकता, रोखठोकपणाचाच ठसा उमटतो.
कुंचल्याच्या फटकार्‍यांतून विरोधकांना गारद करणारे बच्चु भाऊ, खींचो न कमान को न तलवार निकालो – जब तोप मुकाबील है तब अखबार निकालो म्हणणारे बच्चुभाऊ! लाखोंच्या सभेसमोर उभे राहून महाराष्ट्रातील माताभगिनी आणि तमाम शेतकऱ्यांना आवाहन करणारे बच्चुभाऊ. कोणत्याही काळात, कोणत्याही देशात निर्माण होणार्‍या महानायकाचा एक महत्वाचा गुणविशेष मानला जातो तो हाच की त्या नेत्यामुळे, त्याच्यासोबतच्या आणि नंतरच्या पिढ्यांमध्येही प्राण फुंकला जातो. तो नेता, फक्त नेता राहात नाही तर सर्वांसाठीच ते एक संचित बनून जाते. आदरणीय बच्चुभाऊंच्या व्यक्तीमत्वात नक्कीच ही जादू आहे. म्हणुनच भाऊ सलग अपक्ष निवडून येतात ति किंमत बच्चुभाऊंनी कमावली आहे.हे येव्हड सोप नाहीयें..! त्यांनी केलेलि विविध आंदोलन,जनतेची केलिली रुग्न सेवा.शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी पेटुन उठणारा प्रसंगी जिवाचिहि तमा न करणारा खरा योध्दा आहे. भाऊ निश्चियाचे महामेरु आहेत. बच्चु भाऊंच्या आठवणी हृदयात साठवुण ठेवले तरी हृदयाला धडकी भरल्या शिवाय राहणार नाही. नुकताच त्यांना महाराष्ट्रीयन अॉफ द ईयर हा पुरस्कार मिळाला हे त्यांनी केलेल्या कार्याची पावतिच आहे.आणि बच्चु भाऊंनी हा पुरस्कार त्यांच्या कार्यकर्त्याच्या पत्निला जिने आपल्या गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेवून भाऊंना निवडणूकी मध्ये पैसे दिले ह्या माऊली ला समर्पित केला.

asud yatra banner

बच्चुभाऊच्या वक्तृत्वातील जादू ही की, त्यांच्या टिकेचा विषय बनलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते त्यांच्या क्षमतेमधून हुबेहुब जीवंत करून श्रोत्यांसमोर उभा करतात आणि तिथेच त्याची साले काढायला सुरूवात होते. मग अशा असंख्य उदाहरणांत बच्चु भाऊंच्या मिष्किल भाषणातून फटके खाणारे, आज भलेही विचार करीत असेल पण तो संस्कार बच्चुभाउंचा आहे, हे ते सुध्दा मान्य करतील.
मला, मलाच काय वक्तृत्व या अभिव्यक्तीचा अभ्यास करणार्‍या कुणालाही बच्चु कडु या व्यक्तीमत्वामधला नेहमीच आकर्षित करणारा गुणविशेष म्हणजे अगदी कमीत कमी वाक्यांमध्ये टिकाविषयाचा अचूक वेध घेणारी त्यांची शब्दफेक आणि खास वऱ्हाडी शैलीतील बॉम्बफेक. मागे एकदा विधानसभेच्या अधिवेशनात झालेल्या भाषणात सरकार चा समाचार घेताना एका मिष्किल, तिरकस वऱ्हाडी शैलीत बच्चुभाऊ असेच काहीसे उद्गारले होते – ” आज तुम्ही आंघोळीसाठी १० हजार कोटी देता ” अन बिचाऱ्या घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यासाठी तुमच्या जवळ पैसे नाही…!” बस्स.. बस्स..बस्स !!! पुढे काही बोलण्याची गरजच नाही समजणार्‍याला सगळं समजून येतं.
महाराष्ट्राच्या राजकारणात बच्चु कडु ही तोफ गावोगावच्या मैदानांवर कडाडत असताना योग्य तो आदर राखून घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत धाडस करून थेट विचारलेल्या प्रश्नांना छप्परफाड उत्तरे देणारे, मुलाखत संपताच “जय हिंद, जय महाराष्ट्र!” म्हणून पुढे क्षणभरही वाट न पाहता ताड्कन चालते होणारे बच्चु कडु. ह्यांचा वक्तृत्वातील ती अदृश्य जादू आजही तरुणांना आकर्षित करीत आहे.
आई भवानी बच्चु कडु साहेबांना अशाच प्रभावी वक्तृत्वाचं शतक ठोकण्याचं, अपंगांचे आणि माझ्या कष्टकरी बळीराजांचे अफाट कार्य करण्यासाठी बळ देवो!
शेवटि मि आदरणीय बच्चुभाऊ बद्दल येव्हडच म्हणेल..

डर मुझे भि लगा फांसला देखकर…,
लेकिन मै बढता गया रास्ता देखकर…,
खुद ब खुद मेरे नजदिक आती गयीं
मेरी मंजिल….,
मेरा होसला देखकर…!!

विशाल नारायण मनवर८०५५५७७७१८

Comments

Popular posts from this blog

बच्चु भाऊ यांच्या कडून मिळालेला सन्मान

शिवाजी भाऊ गाडे