बच्चु भाऊ यांच्या कडून मिळालेला सन्मान
हा सन्मान माझ्या 'प्रहार' च्या प्रामाणिक कार्यकर्त्यास समर्पित....!
कामातील निष्ठेला वंदनीय आमदार बच्चूभाऊ यांनी दिली शाबासकी....!🙏
'प्रहार जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून प्रमोद कुदळे काम करतील'....!
हे वाक्य माझं दैवत वंदनीय आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या तोंडातून बाहेर पडले... आणि सभागृहात 'टाळ्यांचा' प्रचंड कडकडाट झाला....
मी शुद्ध हरवल्या सारखा काही क्षण स्तब्ध होतो, मला भाऊंचे ते वाक्य निट ऐकायला आले नव्हते, तसा माझ्या कानावर माझा विश्वास बसत नव्हता. त्या बैठकी नंतर हळू हळू माझ्या सहकारी मित्रांनी, जेष्ठांनी माझे अभिनंदन करणे सुरू केले. माझी अवस्था भांबावलेली होती. भाऊंचा निरोप घेऊन मी उस्मानाबादला जाणार होतो, तो वर सोशिअल मीडियावर माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला होता.
माझी धडकी वाढली होती. काही मित्रांचे फोन आले...'खरे आहे का..?' मी आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकलो नाही.
शेकडो फोन आले मी धन्यवाद! धन्यवाद! म्हणत होतो.
दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद, सोलापूर सभा होत्या त्या सभेत माझे कान एक शब्द ऐकण्यासाठी आतुर झाले होते....अन वं. बच्चू भाऊंनी सभेच्या मार्गदर्शनास सुरवात करतांना 'महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख आमचे प्रमोदराव' असे म्हटले आणी मग मला भाऊंनी दिलेल्या नव्या जबाबदारीची जाणीव झाली....
माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास एव्हढ्या मोठ्या पदाची जवाबदारी मिळणे म्हणजे महाराष्ट्रातील आजच्या राजकारणातील ऐतिहासीक घटना ठरावी अशी आहे. अगदी गावपातळीवरच्या पदा साठी इतर कुठल्याही राजकीय पक्षात काय स्पर्धा असते याची जाणीव कार्यकर्त्यांना आहे. प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या नोंदणीस केवळ ४ महिन्याचा कालावधी झाला असेल. त्या पूर्वी माझ्यावर वं. भाऊंनी प्रहार संघटनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. पक्ष स्थापने नंतर दोन महिन्यात भाऊंनी मला मराठवाडा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. या दरम्यान भाऊंच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन मी कामास सुरवात केली.
वंदनीय बच्चूभाऊचे विचार त्यांचा त्याग, सेवा, समर्पण त्यांची निर्भीडता, निस्पृहता, आणि निस्वार्थ नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे याची जाणीव होऊ लागली.
प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. मी प्रहारचा सेवक म्हणून निष्ठेने काम करत गेलो....
वंदनीय बच्चूभाऊ यांच्या विचारांनी भारावलेले सहकारी मिळत गेले आणि संघटनेचे रोपटे मराठवाड्यात लावल्या गेले. पहाता पहाता काम उभं राहताना दिसलं.... त्या दिवशी वंदनीय भाऊंनी माझ्यावर जी जवाबदारी टाकली ती त्यांची सामान्य कार्यकर्त्या मधील प्रमाणिकतेला, निष्ठेला, तळमळीला, मेहनतीला दिलेली शाबासकी होती हे आज लक्षात आलं....
वंदनीय भाऊंच्या या निर्णयाच भाऊंच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या पक्षातील सर्व ज्येष्ठांनी, सहकारी मित्रांनी स्वागत केलं याचा मला प्रचंड अभिमान आणि आनंद होत आहे.
आज जबाबदारीच्या जाणीवेतून आनंद तर झालाच पण थोडी काळजी सुद्धा लागली आहे. पण मला कालच्या कामाचा अनुभव माझी शिदोरी आहे. भाऊंचे भक्कम पाठबळ सहकारी मित्रांचे प्रोत्साहन, कुटुंबातील सहकार्य आणि वं.आ. बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांचे सामर्थ्य सोबतीला आहे त्यांचा आशीर्वाद आहे. मी ही जवाबदारी पूर्ण क्षमतेने, निष्ठापूर्वक, प्रामाणिक पार पडणार हा विश्वास आहे.
या प्रवासात संबंध महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटन उभे करतांना पक्षातील जुन्या जाणत्या मंडळींचे मार्गदर्शन घेऊन, ज्येष्ठांचा आदर, नव्या सहकारी मित्रांचा सन्मान राखेन...
वंदनीय भाऊंच्या विचारांचे बीजारोपण महाराष्ट्राच्या प्रत्येक गाव खेड्यात करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊ.
गर्व से कहो हम किसान है....ईस देश की शान है...!
हा भाऊंनी दिलेला नारा बुलंद करू. तरुणांच्या मनातील जात, धर्म, पंथ, भाषा, राजकीय पक्ष व नेत्याच्या गुलामीची मानसिकता बदलून टाकण्यासाठी भाऊंनी निर्माण केलेली 'सेवा, त्याग, समर्पण' ही नवी परिभाषा रुजविण्याचे काम करू.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, दिव्यांग, शोषित, वंचितांचा, उपेक्षितांच्या लढ्यासाठी वंदनीय भाऊंच्या विचारांची मोठी ताकत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू. माणुसकीला व सेवेला धर्म मानून वेदनेशी नातं जोडा हा भाऊंचा मुलमंत्र या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत रुजविण्याचे काम माझ्या वाट्याला आले हे माझे भाग्य आहे. मला मिळालेला सन्मान मी माझ्या पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी व माझ्या सर्व सहकारी मित्रांना समर्पित करतो. आणि आता राज्य व्यापी मोहिमेला सुरवात करतो.
सर्वांचे प्रेम, मार्गदर्शन, सहकार्य असेच कायम सोबत असू द्या...!
आपल्या सर्वांचा नम्र
प्रमोद कुदळे
9422396999
Comments
Post a Comment