गंगापूर मध्ये प्रहार
कुठल्या तरी कामाच्या अपेक्षा घेऊन तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून पायपीट करत तालुक्याला आलेले गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी गरीब लोक एका बाकावर बसून होती. परंतू अनेक कार्यालये मोकळी, आतील फॅन आणि लाइट सुरू, काही कार्यालयाला चक्क कुलूप, सुमारे दहा ते बारा अधिकारी गायब..., तेवढ्यात प्रहार जनशक्ती पक्ष गंगापूरचे पदाधिकारी एका पत्रकारांसह कार्यालयात येतात. हे नाटकातील किंवा चित्रपटातील दृश्य नाही, तर औरंगाबाद मधील गंगापूर पंचायत समितीमध्ये शुक्रवारी दि. ०८ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वांनी पाहिलेले चित्र आहे.
या पंचायत समिती कार्यालयातील अनेक अधिकारी हजर नसतात, कधीही येतात, कधीही जातात, हे सर्वसामान्य नागरिकांना कळत नाही. नागरिकांनी विचारले की, " साहेब फिरतीवर गेले,‘ असे उत्तर मिळते.
सदर अपंग नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. भाऊसाहेब शेळके पाटिल, संपर्क प्रमुख रऊफ पटेल, जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, युवा आघाडी जिल्हा प्रमुख कल्याण जाधव व प्रहार संघटनेचे कार्यकर्त्ये आणि एक पत्रकार बंधू हे सर्व जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भाऊ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंगांचा ३% निधी तात्काळ खर्च करावा म्हणून मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांना सकाळी साडे अकरा वाजता आणि नंतर दोन वाजता या मागणीचे निवेदन देण्यासाठी पंचायत समिती गंगापूर येथे भेट दिली. त्या दोन्हीही वेळी वरील चित्र पाहण्यास मिळाले.
कार्यालयाची वेळ सकाळी १०:३० ते ०५:३० अशी असताना साडेअकरा वाजेपर्यंत अधिकारी उपस्थित नव्हते. पंचायत, बांधकाम विभाग, एकात्मिक बालविकास योजना कार्यालय, पाणीपुरवठा, अर्थ, शिक्षण विभागाची व तसेच इतर विभागाची पाहणी केली असता कुणी आत, कुणी बाहेर, कुणी गायब तर कुणी रजेवर आहे असे चित्र बघायला मिळत होते. त्यात अत्यंत चिड निर्माण यावी अशी बाब म्हणजे अधिकारी तर गायबच होते परंतु गंगापूरचे एवढे दुर्दैव की तेथील कार्यालयात शिपाई सुद्धा बघावयास मिळत नव्हता. असा एकंदरीत सगळा रामभरोसे अनागोंदी कारभार गंगापूर पंचायत समितीचा चालताना दिसतोय.
बर्याच वेळा नंतर शेवटी प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांना पंचायत समिती कार्यालयाचा एक शिपाई भेटला तेव्हा त्यांना अधिकारी गैरहजर असल्याबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. तेव्हा तिथे कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने पंचायत समितीचे शिपाई यांच्याकडे निवेदन देऊन प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
अनेक छोट्या-मोठ्या बाधित झालेल्या अपंग, अनाथ लोकांच्या जनसेवा व गोरगरिबांच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समिती विभागाची घरघर लागल्याची स्थिती आहे तेव्हा ही बाब प्रहार पदाधिकाऱ्यांनी सरतेशेवटी भेटलेल्या मा. सभापती श्रीमती गायकवाड यांना सुद्धा कळविण्यात आली परंतू तेही अधिकाऱ्यांचा ठाव लावण्यात असमर्थ राहील्या... आता याकडे पंचायत समिती अधिकारी किंवा जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी आतातरी लक्ष देणार का? हा खरा प्रश्न आहे.
गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदारपणा अपंगांच्या बाबतीत होतांना दिसून येत आहे. अपंगांच्या कल्याण व स्वावलंबनाकरिता काहीच न करणे ही मानसिकता निश्चितच घृणास्पद प्रकार आहे. त्याला सर्वस्वी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ( ग्रामसेवक ) जबाबदार आहेत. अशी प्रतिक्रिया थेट अपंग बांधवांकडून येत आहे. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील भेंडाळा, कायगाव, भिवधानोरा, गळनिंब, वाहेगाव, जामगाव, मांजरी व इतर गावातील ग्रामसेवकांनी अपंग बांधवांना अगदी मेटाकुटीला आणलेले आहे. ग्रामसेवक फक्त टोलवाटोलवी करून प्रकरण लांबविण्याचा प्रयत्न करत आहे. 'निधी व स्वउत्पन्न कमी झालेले आहे... यातून देता येत नाही/ नसतो... त्यातून देता येत नसतो... असे तद्दन खोटे सांगून गरीब अपंगांचा हक्क मारण्यासाठी बोलले जात आहे. परंतू ग्रामसेवकांच्या या दप्तर दिरंगाईला प्रहार अपंग क्रांती आंदोलन नक्कीच धडा शिकवणार आहे. 'त्यासाठी अपंगांची मते जाणून घेतली जात आहेत.' असे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भाऊ गाडे यांनी म्हटले आहे.
सदरील अपंगांचा ३% निधी खर्च करण्यासंदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांचे आदेश असतांना देखील तालुक्यातील ग्रामपंचायतीने ३० ऑगस्ट रोजी विशेष ग्राम सभा बोलावून निधी खर्च करणे आवश्यक असतांना देखील ग्रामपंचायतींनी आदेशाची पायमल्ली केलेली असल्याने त्याकरिता गटविकास अधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा अहवाल १४ सप्टेंबर पर्यंत प्रहार पक्ष्याने मागविला आहे. तसेच दि. १८ सप्टेंबर २०१७ पर्यंत निधी खर्च न केल्यास मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार शैलीने आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनात काही हानी झाल्यास त्याला सर्वस्वी पंचायत समिती गंगापूर प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
आप्पासाहेब एन. तुपे
प्रहार सेवक
Comments
Post a Comment