सक्षम जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ गाडे
_छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या सहवासात रमणारे... किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणारे... प्रत्येक गड किल्ल्यांवर वृक्षारोपण असो वा एखाद्या रक्तदान शिबिरात स्वतः जातीने हजर राहणारे...स्वतःच्या अल्पशा पगारातही दरवर्षी अपंगांसाठी स्वखर्चाने शिवदुर्ग गडाच्या सहली आयोजित करणारे... प्रहार जनशक्ती पक्षाचे महत्त्वपूर्ण संघटक व प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबादचे प्रमुख जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भाऊ गाडे औरंगाबादकरांना मिळालेले एक निडर, परखड, ध्येयवादी व्यक्तीमत्व. शारिरीक अपंगत्व असतानाही कळसुबाई शिखर सलग पाच वेळा सर करून आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवदुर्ग गड किल्ले शंभर पेक्षाही अधिक वेळा चढाई करणारे असे ध्येयवादी रत्न औरंगाबादकरांना मिळणे ही बाब आपल्या साठी निश्चितच अभिमानास्पद आहे._
_महाराष्ट्राची बुलंद तोफ..._
_आपल्या सर्वांचे आदरणीय, वंदनीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक यांनी त्यांच्यातील चांगले गुण ओळखत औरंगाबाद मधील अपंग बांधवांच्या मदतीसाठी त्यांना पक्षाचे महत्त्वपूर्ण स्थान देऊन समस्त औरंगाबाद मधील अपंगांसाठी एक नवी उमेद उभी केली. तेव्हापासून आजतागायत जिल्हाभरातील कोणत्याही अपंग व्यक्तीचा फोन आला तर तातडीने त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांच्या तक्रारीचे निवारणासाठी कायम तत्पर असतात. एक प्रेमळ मनमिळाऊ आणि विरोधकासमोर कणखर असा त्यांचा स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. मोर्चे असो किंवा आंदोलने त्यामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्या अधिकार्यांना घाम फोडल्या शिवाय राहत नाहीत._
_औरंगाबादकरांना असा परखड, चाणाक्ष, अभ्यासू जिल्हाध्यक्ष मिळाल्याने अपंगांना त्यांच्या संपर्कातील शासकीय कामे कधीच अडकून पडले नाही. कोणत्याही परिस्थितीत अपंगांची समस्या सोडवणारच... यामुळे त्यांचा जिल्हाभरातून वाढता जनसंपर्क असल्याने ते खुपच प्रसिद्ध असे व्यक्तीमत्व आहे. कारण अशा गरीब अपंग लोकांसाठी वेळ आल्यावर स्वतःच्या जीवाची सुध्दा पर्वा करत नाही. याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनाही आली होती. ज्यावेळेस औरंगाबाद मधील घाटी रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य राखीव दलाच्या शिपायासोबत वाद झाला होता. असा इतरांसाठी रक्त सांडणारा माणूस क्वचितच बघायला मिळतो. त्यांच्या बाबतीत कितीही लिहिले तरी कमी पडेल एवढी त्यांची महती आहे._
_अशा त्यांच्या या महान कार्याची दखल घेत वंदनीय बच्चु भाऊ कडू यांनी दि. ०२ सप्टेंबर २०१७ रोजी शेगाव येथील अपंग राज्यस्तरीय मेळाव्यात माननीय शिवाजी भाऊ गाडे यांचा प्रहार जनशक्ती पक्षातील सर्वोत्तम समजला जाणारा व संपुर्ण महाराष्ट्रातून एकच निवडला जाणारा सक्षम जिल्हाध्यक्ष पुरस्कार वंदनीय बच्चु भाऊ कडू यांच्या हस्ते प्रदाण करण्यात आला.
त्यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तेव्हा शिवाजी भाऊ गाडे यांना हा सत्कार व पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष गंगापूर तर्फे अभिनंदन रूपी लक्ष लक्ष शुभेच्छा.!!
आप्पासाहेब एन. तुपे
प्रहार सेवक
Comments
Post a Comment