गंगापूर तालुक्यातील शेती प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे, प्रगतशील शेतकरी तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे झुंजार, परखड नेतृत्व व तालुकाध्यक्ष श्री. भाऊसाहेब शेळके पाटील यांना मानाचा "मराठवाडा भूमिपुत्र पुरस्कार-२०१८" हा दैनिक लोकपत्रच्या वतीने जाहीर करण्यात आल्या बद्दल भाऊसाहेब शेळके पाटील यांचे मनःपुर्वक अभिनंदन .
दैनिक लोकपत्र यावर्षीपासून समाजाच्या विविध क्षेत्रात विशिष्ट उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना "मराठवाडा भूमिपुत्र" व "मराठवाडा भुमिकन्या" हा पुरस्कार देऊन सन्मानित करत असून दैनिक लोकपत्र औरंगाबाद आवृत्तीच्या २३ व्या वर्धापनदिना निमित्त २३ व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात ११ भूमिपुत्र व १२ भुमिकन्यांचा समावेश आहे.
गंगापूर तालुका हा विचारांचा व चळवळींचा तालुका आहे. हा तालुका आवर्षणप्रवण असून येथे सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. भाऊसाहेब शेळके पाटील गंगापूर येथील भिवधानोरा या छोट्याशा गावातून मराठवाडा व औरंगाबाद मधील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पुरस्कार यादीत सामील झाले आहेत. कारण त्यांचे शेतकरी प्रश्नांसाठी असलेले योगदान हे तालुक्यासाठी मोलाचे ठरले आहे. यात विशेष म्हणजे गंगापूर तालुक्यात सर्वप्रथम भाऊसाहेब शेळके यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे सामाजिक आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये एक धडकी भरवणारी राजकीय परिस्थिती आजघडीला निर्माण केलेली आहे.
वंदनिय आ. बच्चु भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब शेळके यांनी येथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, ऊसदर, कापसाच्या भावासाठी परखडपणे संमेलने , आंदोलने आणि उपोषणे करून मोठ्या जिद्दीने एक संघटनात्मक ताकद उभी करून गोरगरीब शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केला आहे आणि करत असतात. त्यांनी अलिकडेच ऊसदरासंदर्भात गंगापूर येथील कायगाव येथे ऊस परिषद यशस्वीरीत्या आयोजित करून त्या परिषदेस मोलाचे योगदान दिले. तसेच गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देऊन शेतीचा दुष्काळी परिस्थितीतही विकास कसा साधला पाहिजे. याविषयी मित्र परिवार व तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यासोबतच पाण्याची बचत व काटकसर हा मंत्र सतत जोपासला आहे. कृषी क्षेत्राची आवड व व्यापारी दृष्टीकोनाबरोबर नाविण्यपुर्ण उपक्रम यामुळे शेती व्यवसायातही मोठा आनंद निर्माण करून सामाजिक व राजकीय वातावरणात एक वेगळा ठसा उमटविला आहे. भाऊसाहेब शेळके पाटील यांचे काम युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
यावेळी त्यांना पुरस्कार जाहीर झाला असल्याचे कळविल्यानंतर उत्तर देतांना भाऊसाहेब शेळके पाटील म्हणाले की,
"छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहु-फुले-आंबेडकर या महान महापुरुषांचा आदर्श घेऊन व वंदनीय बच्चु भाऊ कडू यांच्या कार्याने मला एक प्रेरणा मिळाली आहे आणि त्या प्रेरणेतूनच मी सामाजिक कार्यात सहभागी होऊन माझ्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अपंग व रूग्ण बांधवांसाठी काहीतरी करण्याचे ठरवले आहे. तेव्हा जरी मी राजकीय अस्तित्वात काम करत असलो तरी सामाजिकतेची जाणीव मी नेहमी लक्षात ठेवतो. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यास युवकांना नव्या रोजगारांच्या संधी निर्माण होतील. हा पुरस्कार तालुक्यातील शेतकऱ्यांचा असून ह्या पुरस्काराने आणखी काम करण्याची उर्जा मिळाली असल्याचे ही ते म्हणाले. अशा या निर्भीड व्यक्तीमत्वास माझ्या अगणित अभिनंदनरूपी शुभेच्छा !
शुभेच्छूक :-
आप्पासाहेब एन. तुपे

Comments
Post a Comment