असामान्य व्यक्तीमत्व
असामान्य व्यक्तीमत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भेंडाळा गावाचे भाग्य विधाते व आम्हा तरुणांचे प्रेरणास्थान व निर्लोभ समाजकारणी व भेंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री. रामेश्वर परभणे पाटील यांचा आजचा वाढदिवस हा आमच्यासाठी आनंदोत्सवच.
रामेश्वर परभणे पाटील यांची भेंडाळा ग्रामपंचायत व पंचक्रोशीत सरपंच म्हणून ओळख जरी असली तरी मात्र मी भाऊ याच नावाने त्यांना संबोधतो. आणि तेसुद्धा जेव्हा मी गावाकडे आलो की माझी नेहमीच आत्मियतेने विचारपूस करत त्यामुळे त्यांच्यातील आपुलकी व आपलेपण असं बहुआयामी व्यक्तीमत्व त्यांच्या स्वभावातून प्रकर्षांने जाणवते.
भाऊ विषयी लिहिण्या इतका मी मोठा नाही तरीदेखील त्यांच्या विषयी दोन शब्द लिहिण्याचे धाडस मी करत आहे. उजळ माथ्याची आणि स्वच्छ हाताची माणसे आज अत्यंत दुर्मिळ होऊन बसली आहेत. परंतू भाऊंच्या रूपाने गावाला मिळालेले सर्वोत्तम बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले आहे. जिकडे पाहवे तिकडे अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, घोटाळे, व गैरव्यवहार दिसून येतात. प्रामाणिकपणा, सचोटी, परिश्रम, सौजन्य, सात्विकता, सरळपणा, सत्य, सहानुभूति, संवेदनशीलता, नि:स्वार्थीपणा, निरलसता, निर्लोभीपणा, निर्मोहीपणा, निष्कामवृत्ती हे शब्दच आपल्या व्यवहारातून हद्दपार झालेले दिसतात.
अश्यावेळी गावातील सरपंचपदी आणि तेही अल्पशा कालावधीत एखादा माणूस सुर्याच्या तेजाने चमकतो. सर्वांना सत्य, प्रेम, बंधुभाव, न्याय, स्वातंत्र्य, समता, ममता, आणि निष्कपटपणाचा एक नवा आदर्श दाखवतो. अश्या माणसामध्ये गंगापूर तालुक्यातील भेंडाळा गावचे सरपंच मा. श्री रामेश्वर परभणे पाटील यांचे नाव संपूर्ण तालुक्यात अत्यंत आदराने व सन्मानाने घेतले जाते.
रामेश्वर परभणे पाटील या शब्दातच गावातील सामाजिकतेविषयी प्रेम आणि जबाबदारीने आपल्या समाजाला व गावाला बिनचूक दिशा दाखवणारे व्यक्तीमत्व दडलेले आहे. अगदी अश्याच प्रकारे केवळ मीच नव्हे तर संपूर्ण गावातील प्रत्येक व्यक्ति त्यांना भाऊ म्हणून व सरपंच म्हणून ओळखतो.
रामेश्वर भाऊ हे अतिशय प्रामाणिकपणे गावाच्या सुखामध्ये पाठ थोपटण्यासाठी व दु :खात आधार देण्यास नेहमीच तत्पर असतात. लोकसंघटन कौशल्य भाऊ जवळ आहे. ते समाजासाठी मनापासुन मार्गदर्शन व मदत करतात. हे त्यांचे मुख्य कारण आहे. समाजकारणात कपटी व धुर्तपणा कधीच केला नाही. एका रेषेत उत्तम मार्गदर्शन व त्यातून समाजकारण हे भाऊंचे खास वैशिष्ट्ये आहे. वटवृक्षाप्रमाणे आलेल्या प्रत्येकास मदत रूपी सावली देण्याचा वसा त्यांनी आजतागायत जपला आहे. संपूर्ण तालुक्याच्या व गावाच्या प्रत्येक कोपर्यातून कोणाचेही निमंत्रण असो, त्या कार्यक्रमाला आवर्जून व वेळेत पोहचण्याचा शिरस्ता कायम पाळला आहे त्यामुळे त्यांचे नेतृत्व कचखाऊ न वाटता खंबीर व धडाकेबाज वाटते.
आमचे ज्येष्ठ बंधू आबासाहेब तुपे सांगतात, रामेश्वर शालेय जीवनापासूनच चुणचुणीत, हुशार विद्यार्थी असत... दहावी नंतर B.Sc., M.Sc. शिक्षण घेऊन नोकरीच्या चौकटीत स्वतःला बांधून न घेता एक व्यावसायिक, व्यापारी उद्योग करण्याचाच त्यांनी पर्याय निवडला याचे कारण म्हणजेच नोकरीतून सामाजिक काम करण्यास अडचणी येतील असा समज... त्यामुळे जनतेत राहुन जनतेचीच कामे करण्याचा त्यांचा बालमनापासूनचा ध्यास आजही ते जोपासत आहेत. शाळेत असतांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे तसेच राष्ट्रभक्ती आणि शिस्त यांचे धडे तर उपजतच घरातील वातावरणातून त्यांच्यात ठासून भरलेले असल्याने सामाजिक कार्यात ते अग्रेसर असत आणि त्यामुळेच ते गुण आजही आहेत.
आमच्या भेंडाळा गावातील व सबंध तालुक्यातील राजकीय, सामाजिक स्तरावरील अनेक संस्थांमध्ये भाऊ सक्रिय आहेत. समाजात काम करताना स्वच्छतेने केले पाहिजे असे भाऊंचे मत आहे. भाऊंना गावातील परिचित आहे ती म्हणजे विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा सरपंच व शिवजयंतीचा कार्यकर्ता. सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे काम भाऊ वय वर्षे चौदा पासून आजतागायत अविरतपणे करीत आहे. या उपक्रमात भाऊंनी अनेक भुमिका समर्थपणे पार पाडल्या. भाऊंचा "सामान्य कार्यकर्ता ते सरपंच" असा उल्लेखनीय प्रवास आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मिरवणुकीचे रूपांतर त्यांनी सर्व मित्र व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवमहोत्सवात रूपांतर केले. या महोत्सवात नवनवीन कल्पना घेऊन नवीन उपक्रम आणले. उदाहरणार्थ शिवचरित्रावरील वक्तृत्व स्पर्धा, शिवचरित्रावरील व्याख्याने, शिवचरित्रावरील प्रश्नमंजुषा, चित्रकला, समाज प्रबोधनात्मक किर्तने असे भरीव कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्ते यांना सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याचा प्रयत्न केला जातोय हीच त्यांची विशेष बाब. शिवजयंतीच्या कार्यात नवनवीन तरूण कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाते. आणि आज सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे बरीच वर्षे पूर्ण केले आहेत. यात वेळोवेळी येणारी जबाबदारी भाऊंनी यशस्वीपणे पार पाडली. यात त्यांच्या सहकार्याचे सहाय्य मोठ्या प्रमाणात होत आहे.
रामेश्वर भाऊ या नेतृत्वाने आमच्या ग्रामीण भागातील व खेड्या-पाड्यामध्ये गरीबीत अनंत अडचणींना तोंड देणारे व त्या दारीद्र्याचे चटके सोसणार्या लोकांमध्ये दिवस काढले आहेत. त्यामुळे अडलेल्या - नडलेल्या व गरीबांच्या दु:खाची त्यांना चांगलीच जान आहे. भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकास ते आवर्जून भेटतात. व त्यांची आस्थेने विचारपूस करतात. काम करने शक्य नसल्यास ते मार्गदर्शन व दिलासा देतात. त्यामुळे भाऊंना भेटण्यासाठी आलेला प्रत्येक व्यक्ति समाधानी असतो. या विशाल वटवृक्षाने गावाला, समाजाला व समाजातील प्रत्येक व्यक्तिचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या अथक परीश्रमाने सकारात्मक दृष्टिकोणाच्या जोरावर संपूर्ण गावात मजबूत विकासकामे झाली आहेत. त्यामुळे आज एक कुशल जानकार, सहृदय नेता म्हणूनच भाऊ प्रसिद्ध आहेत.
सध्याचे युग गतिमान आहे. या युगात विविध क्षेत्रात प्रचंड वेगवान बदल घडत आहेत. ज्ञानाचा होणारा विस्फोट, माहिती तंत्रज्ञानात झालेली अभूतपूर्व क्रांति, शिक्षण क्षेत्रात झालेले आमुलाग्र बदल होता ज्ञानाच्या कक्षा एकाच स्तरावर येत आहेत. समाजकारणात कार्यकर्त्याचे ज्ञान नेत्यांपेक्षाही जास्त असते. या बदलांना सामोरे जाण्यासाठी व समाजातील प्रत्येक घटकांचा दर्जेदार विकास होण्यासाठी प्रत्येकाने आपल्यात बदल घडवून वाटचाल केली पाहीजे. असे भाऊंचे स्पष्ट मत आहे. त्यांना भेटलेली व्यक्ति आयुष्यभर त्यांना विसरु शकत नाही. कितीही काम असले तरी त्यांच्या तोंडावरती थकवा कधीच जाणवत नाही. भाऊंचा सतत हसरा चेहरा, तोंडात मधाळ वाणी समोरच्या व्यक्तिवर छाप पाडतच असते.
आजपर्यंत अत्यंत निष्ठेने, समर्पित भावनेने, व्यासंगी वृत्तीने कामकरणारे व्यक्तीमत्वाचा सरपंचपदी निवड गावासाठी नक्कीच उर्जीतावस्था प्राप्त करणारी गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या विकासकामाने गावात नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. या बद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो व पुन्हा एकदा वाढदिवसाचा शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस मनापासुन शुभेच्छा देतो.

Comments
Post a Comment