"दुःख केव्हढं आभाळा एव्हढं!"
दुःख केव्हढं आभाळा एव्हढ आता अपेक्षा फक्त बच्चू भाऊ कडून…
प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपर्क अभियाना दरम्यान नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे गेलो. विश्रामगृहावर पाच-पन्नास निराधार वृद्ध माऊल्या जमल्या होत्या. काहींना ५ वर्षा पासून निराधार योजनेचा लाभ बंद झाला होता. तर गेल्या ४-६ महिन्यापासून ‘पगारच’ आला नाही म्हणून त्या अस्वस्थ होत्या.
मग विचारले ह्या सर्व इथं कशाला आल्या ‘आज आम्ही यांना काय देऊ शकणार आहोत’? मग मला समजले की बच्चू भाऊ कडू यांचे लोकं येणार आहेत हे समजले म्हणून त्या तेथे आल्या होत्या. न्यायाच्या अपेक्षेने... मनात क्षणभर विचारांचे काहूर माजले.
एका बच्चू भाऊ कडून आज राज्यातल्या शेतकऱ्यांना, अपंगांना, निराधार वृद्धांना, पीडितांना किती मोठ्या अपेक्षा आहेत. आणि मग आता बच्चू भाऊंच्या विचारांची ‘माणसं’ संघटनेत जोडून, अन्याया विरुद्ध लढणारे संघटन अधिक मजबुतीने उभं रहावं म्हणून प्रचंड मेहनत करावी लागेल.
एक १०,२० तीन मिनटं सर्वांशी संवाद साधून खाली बसलो तर गर्दीमुळे हॉल च्या दरवाज्यात एक मूल कडे-खांद्यावर घेऊन महिला उभी होती. ती सुद्धा बच्चू भाऊंच्या माणसांना तिचे दुःख सांगण्यासाठी आली होती.
प्रसंग खालील प्रमाणे...
मी त्यांना समोर बोलवले साधारण तीस पस्तीशीतील ती भगिनी तिच्या मुलाला घेऊन आली होती. १० किलो वजन असेल त्या मुलाचं आणि वय ११ वर्ष उंची असेल २ फुटाची. दोन पाय एममेकांना जोडून असलेले, लहान डोळे, अगदीच लहान चेहरा, हातांची बोटं मूठ अवळलेली कसं वर्णन करावं हे सुद्धा सुचत नाही.
त्या मुलाला त्या ‘आई’ने खाली ठेवले
अन तो रडायला लागला, किंचाळत होता
पाषाणालाही पाझर फुटावा अस ते सारं दृष्य मन हेलावून आले, काय असतो जन्म, काय असतं जगणं, काय असतं मातृत्व… ‘देवाने याला जन्माला घालायला नको होत’ म्हणून ती भगिनी रडायला लागली.. गेली ११ वर्ष रोज रडत तिचे अश्रू सुद्धा आटले होते. शासन काही देत नाही, त्या मुलाला त्या ‘जीवाला’सोडून मोलमजुरी सुद्धा धड करता येत नाही, त्याचे वडील मजुरी करतात. कस चालवायचं हे सर्व प्रश्न मोठा आहे. पण त्याही पेक्षा भयंकर आहे त्या माऊलीचं ‘मातृत्व’ जपणं.
‘आई’ या विषयाची महती सांगणारे अनेख लेख मी वाचले आहे. पण ती ‘आई’ पाहिली तर खरं मातृत्व कळेल.
ती म्हणाली,“माझा नवरा म्हणतो कशाला कुठं घेऊन जाते लेकराला... कोणी काही देणार नाही." तो रागावतो तरीही मी मदतीच्या अपेक्षेने जिथे तिथे जाते. आता दादा फक्त बच्चू भाऊ आम्हाला न्याय देऊ शकतात. त्या भगिनींचे ते सर्व ऐकले परत आलो मनात ते "दुःख घेऊन दुःख केव्हढं तर अभाळा एव्हढं!" आता वंदनीय बच्चू भाऊंच्या प्रत्यक्ष भेटीत मी या विषयावर बोलीन. त्या जन्मजात दिव्यांगां करीता काही करता येईल असं वाटत नाही. पण त्याचा सांभाळ करणाऱ्या माझ्या त्या बहिणीच्या डोळ्यातले चार अश्रू कमी करण्याचा, तिचे दुःख हलकं करण्याचा प्रयत्न माझ्या दैवत नेतृत्व वंदनीय बच्चू भाऊ यांच्या कडून होईल ही खात्री आहे. वेदनेशी नातं जोडा असा मूलमंत्र देणाऱ्या बच्चू भाऊंच्या विचारावर काम करण्यासाठी अनेक सहकारी पुढे येत आहेत. आणि हीच खरी प्रहार जनशक्ती पक्षाची भविष्यातील मोठी शक्ती असेल हा विश्वास आहे.
प्रमोद कुदळे
महाराष्ट्र संपर्क प्रमुख
प्रहार जनशक्ती पक्ष
(या लेखाची तारीख उपलब्ध नाही तरी आदरणीय प्रमोद भाऊ कुदळे यांनी लेख कधीचा आहे तो आपल्या कार्यकर्त्यांना सांगावा ही विनंती.)
Comments
Post a Comment