एकच नायक

भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

प्रासंगिक लेख
लेखन व शब्दांकन

महेश ठाकरे
राज्य समन्वयक
प्रहार शिक्षक संघटना.
सं.क्र. ७७४५८२३४९२

टळटळीत उन्हाची आजन्म सोबत करणाऱ्यांचा पंथ दिवसेंदिवस र्हास पावतो आहे. अतिसामान्य माणसाला ज्यांच्या खांद्यावर डोके ठेऊन आपल्या दुःखांना वाट मोकळी करून द्यावीशी वाटते, ज्यांच्या केवळ असल्यानेच त्यांचे दुःख नाहीसे होण्याची होते. अश्या वंचितांच्या दुःखासाठी वाटेल तेथे धावून जाणे हाच पुढे ज्याच्या आयुष्याचा अलिखित कायदा बनतो. असा बच्चू कडू सामान्यांचा एकच नायक ठरतो.

गावसवंगड्या सोबत कबड्डी खेळणारा, स्वच्छतेची सेवा करणारा, अंध, अपंगाचा आधार होणारा, गोर गरीबांच्या झोपडीत, त्यांच्या ताटात जावून जेवणारा, त्यांना जेवू घालणारा आमदार किंवा नेता असतो हे अविश्वसणीय असले तरी ते आमदार बच्चू कडू यांच्या रूपाने आज अख्खा महाराष्ट्र अनुभवतोय .

ज्याच्या काळजात गोरगरीबांविषयी कमालीची तळमळ आहे. अन्याय-अत्याचाराविरुध प्रचंड चिड आहे. राष्ट्रावर, समाजावर प्रचंड प्रेम आहे असा बच्चू सामान्यांचा महानायक ठरलाय. अख्ख आयुष्य वंचितांच्या वेदनेला अर्पण करणारा, व ते जगणारा लोकप्रतिनिधी आज विरळाच... जनसामान्यांवरील अन्याया विरुध्द अनेक वैविध्यपूर्ण आंदोलना करीता नावलौकीक असणारा सामान्यांचा महानायक आमदार बच्चू कडू आपलं आयुष्यही वंचितांचा आधार म्हणून जगणार आहे़. नव्या तरुण पिढीपर्यंत पोहचलेल्या या साध्या माणसाच्या ठेवणीतल्या अनेक आठवणी आहेत. अपंग व निराधारांच्या व्यथांशी जवळीक साधणारा बच्चू आपल्याला माहित असेल पण त्यांच्याच सहवासात सहकुटुंब उर्वरीत आयुष्य अर्पण करण्याचं धाडस करणारा बच्चू कडू मात्र अनेकांपर्यंत पोहचला नाही .

अपंग, निराधारां विषयीच्या त्यांच्या निस्सीम आस्थेला तोड नाही .

कोण कुठल्या आडवळणावरच्या एका बेलोरा या गावातील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा कष्टकऱ्यांच्या आंदोलनासाठी आपले उभे आयुष्य झोकून देतो ही कल्पनाच आजच्या तरुण पिढीला बच्चूभाऊंच्या रूपाने ऊर्जादायी ठरते .

बालवयातच आपल्या मित्राचे प्राण वाचविण्यासाठी विनातिकीट रेल्वे प्रवास करून मुंबई गाठणाऱ्या बच्चूने पुढे कष्टकरी , वंचितांच्या वेदनेशी अतुट नाते जुळवून घेतले. कष्टकरी, वंचितांच्या व्यथेची जाणीव व्हावी म्हणून त्यांच्या झोपडीतील बाजरीच्या भाकरीशी जुळलेले बंध त्यांनी कदापि तोडले नाही. एका सामान्य शेतकर्याच्या मुलाचा कट्टर शेतकरीवादाच्या, कष्टकरीवादाच्या दिशेने सुरू झालेला तो प्रवास होता.

‘माझे जगणे हाच माझा संदेश’ असे म्हणण्याच धारीष्ट फारच कमी लोकांकडे असते. असे शिर्षकी बोलणे आणि त्या बरहूकूम वागणे हा बच्चू कडू या व्यक्तीमत्वाचा स्वभावगुणच असू शकत नाही. मुळात हे रसायनच वेगळे आहे. सार्वजनिक आयुष्यातील काटेकोर आणि निर्वेर जगण्याद्वारे त्यांनी दिलेला संदेश मात्र वरील वाक्याला साजेसा आहे.

प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करण्याची व त्याची छाप मनाच्या अंतर्पटलावर उमटवण्याची अंगभूत कला असणारा लोकप्रतिनिधी म्हणून बच्चूभाऊंचा नामोल्लेख आज राज्याच्या नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पटलावर होतो. अगदी आपला लग्न सोहळा देखिल समाजसुधारणेच्या क्रांतीकारी विचारावर करणारा बच्चू कडू म्हणूनच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतो. विरोधकांनाही त्यांच्या या जगण्याबद्दलचा नि:संदीग्ध विश्वास असणे यातच त्यांचे वेगळेपण दडले आहे. काही व्यक्तींची वैचारिक जडणघडणच इतकी पारदर्शी असते की त्यांच्यावर आरोप करतांना पातळी सोडण्याचे धाडस राजकीय विरोधकांनाही होत नाही. आचरणाचा आव असाच असतो. जगण्याचे मापदंड जेवढे कठोर, सार्वजनिक प्रभाव तेवढा गहीरा. हे राजकीय आत्मभान कमवावे लागते. भुमिकांची धरसोड करणाऱ्यांच्या वाट्याला हा मराबत कधी येत नाही. जगाने पसंती द्यावी अशी नेते पदाची उंची गाठण्याची महत्वकांक्षा अश्या व्यक्तीमत्वांना कधीही नसते.

(नांगर मोर्चा छायाचित्र) 

अंतर्बाह्य कार्यकर्तेपण मुरवून घेतलेल्या साध्या माणसांनाही हा मान मिळतो . व्यक्तीमत्वातील असा बेछुट सरळसोटपणा साऱ्यांनाच सोसवेल असे नाही. व्यसपिठावरील भाषणात व एरवीच्या जगण्यात सारखेपणा जपणारा, अन्याया विरुध्द थेट भिडणारा म्हणूनच सबका भिडू बच्चू कडू म्हणूनच ठरतो.

सलग तिसर्यांदा आमदारकी भुषवणार्या बच्चू कडूंना आजही स्वत:च हक्काचं घर नाही. ते अजूनही भाड्याच्या घरात राहतात ही गोष्ट अविश्वसनीय वाटत असली तरी, ज्यांच्या जगण्यातच संदेश असतो ते घराच स्वप्नही वेगळेपणाने व अविश्वसणीय घटनेने साकारतात.

प्रामाणिक पंथाचा पाईक….

भुमिकेशी तादात्म्य पावलेले असे खडतर वागणे अनेकांना पेलवणारे नसते. अहंकार सोडून वागण्याची कल्पनाही ताण देणारी ठरते. अशा व्यक्तिमत्वांमधील विनम्रतेचे दडपण अनेक महनीयांनाही ग्रासुन टाकते. साधे जगा, मोठे व्हा हा मंत्र सहज साधणारा नाहीच. ज्याला हे साधलं तोच बच्चू ठरला .
व्यवस्थाशरणतेचा आजार भल्याभल्यांना कह्यात घेतो. भिनलेला सत्ता लोभ विचारांशी द्रोह करण्यास भाग पाडतो. वाढते वय व अनुभव संकल्पनांची ताकद संपवते. मग संभ्रमित पावले मिळेल ती झुल पांघरुन घेण्यास सज्ज होतात. अश्यातही बच्चूभाऊंना मात्र माणुसपणाचा ध्यास आकर्षित करतो. तडजोडीची सावलीही अंगावर पडू न देणाऱ्या अश्या नायकांची फळी आता संपत चालली आहे. अगदी किशोरावस्थेपासून अंगिकारलेल्या समाजसेवेचे, रूग्णसेवेचे दिर्घ कालीन नायकत्व वाट्याला आल्यानंतरही ते संपत चाललेल्या प्रामाणिक पंथाचेच पाईक आहेत.

जमिनीला कान लावल्याशिवाय सामान्यांच्या हाका ऐकू येत नाहीत . सामान्यांसाठी लढणाराच त्या हाका ऐकू शकतो. अन् त्या आर्त हाकेला ओ देणारा म्हणूनच बच्चू कडू नावाचा खराखुरा एकच नायक ठरतो. यंग जनरेशनचा आयडॉल ठरतो, त्यांच्या गळ्यातील ताईत बनतो!

या महानकर्तृत्वाची मशाल अशीच अखंड तेवत राहो हीच त्यांच्या जन्मदिनी अगणित शुभेच्छांसह मनोकामना!

जय प्रहार

Comments

Popular posts from this blog

दिनदुबळ्यांचा मसिहा…..!

बच्चु भाऊ यांच्या कडून मिळालेला सन्मान

शिवाजी भाऊ गाडे